श्री सुनिल धनावडे यांना बॅ.पी.जी.पाटील आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार
केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) - सातारा जिल्हा माध्यमिक शाळा सेवानिवृत्त मुख्याध्यापक सेवासंघ सातारा व बॅ.पी . जी. पाटील प्रतिष्ठान सातारा यांच्यावतीने सह्याद्री माध्यमिक विद्यालय दिवदेव मार्ली ता.जावलीचे मुख्याध्यापक श्री सुनिल पांडुरंग धनावडे यांना मा.डाॅ.पंडित विद्यासागर माजी कुलगुरु स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या शुभहस्ते वितरण करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे छञपती शिवाजी काॅलेजचे प्राचार्य डाॅ राजेंद्र माने साहेब होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवासंघाचे अध्यक्ष श्री एस.बी. खराते सर यांनी केले अध्यक्षीय मनोगतात डाॅ पंडित विद्यासागर यांनी नविन शैक्षणिक धोरणास विद्यार्थी, शिक्षक,मुख्याध्यापक यांनी बदलाला समोर कसे जावे याविषयी मार्गदर्शन केले.पुरस्काराला उत्तर देताना श्री सुनिल धनावडे यांनी आपण २५ वर्षे डोंगराळ व दुर्गम भागामध्ये भौगोलिक व सामाजिक परिस्थितीवर मात करत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबर विद्यार्थ्यांंना दर्जेदार सुविधा लोकसहभागातून कशा उपलब्ध करुन दिल्या तसेच आपण सामाजिक ,शैक्षणिक व संघटनात्मक करत असलेल्या कार्याची दखल घेवुन निवड केल्याबद्दल सेवासंघाचे आभार व्यक्त करण्यात आले.कार्यक्रमास सेवासंघाचे सचिव आर एल नायकवडी सर,विद्यासचिव ए.आर माने सर,श्री ढवण सर,श्री बाबर सर,श्री काळे सर,जिल्हा मुख्याध्यापक संघाचे मा.अध्यक्ष श्री संजय यादव उपाध्यक्ष श्री नितीन कोंडे सचिव श्री सुनिल गाडे विद्यासचिव श्री जयवंत तरडे रयत संस्थेचे मा.सचिव श्री माने सर प्रयोगशाळा संघटनेचे राज्याध्यक्ष श्री भरत जगताप केंद्रप्रमुख श्री संपतराव धनावडे,प्राचार्य श्री दिलिप धनावडे प्राचार्य श्री पाटील सर मुख्याध्यापक श्री गुरव सर श्री भिसे सर श्री कुलकर्णी सर,जिल्ह्यातुन आलेले मुख्याध्यापक शिक्षक पंक्रोशितील सरपंच पोलिस पाटील ग्रामस्थ उपस्थित होते.