मेढा येथे उद्या सकल धनगर समाजाचा मोर्चा

0

 


मेढा येथे उद्या सकल धनगर समाजाचा मोर्चा


केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) - धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गामध्ये समावेश करण्यात यावा, तसेच आरक्षणाची सरकारने तातडीने अंमलबजावणी करावी, यासाठी जावली तालुक्यातील सकल धनगर समाजातर्फे सोमवार दि.१८ रोजी जावली तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी जास्तीत जास्त समाज बांधवांनी मोर्चासाठी मेढा येथे दाखल व्हावे, असे आवाहन मोर्चाच्या संयोजकांकडून करण्यात आले आहे. गेल्या ७५ वर्षांपासून धनगर समाज अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित राहिला आहे. शासनाने आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही. अनेक वेळा आश्वासने देऊन समाजाची दिशाभूल केली आहे, त्यामुळे सकल धनगर समाजाकडून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी, आरक्षणाची अंमलबजावणी करून प्रमाणपत्र वितरित करावे . आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)