केळघर - आज कार्तिकी एकादशी निमित्त साई मंदिरातून काढण्यात आलेली पालखी
कार्तिकी एकादशी निमित्त साई मंदिरात पालखी सोहळा
केळघर : प्रतिनिधी - ज्ञानोबा माऊली, माऊली तुकाराम च्या जयघोषात आज कार्तिकी एकादशी निमित्त केळघर येथील श्री. साई मंदिरातून आंबेघर येथील विठ्ठल धाम पर्यंत पायी पालखी दिंडिसह काढण्यात आली.या पालखीला भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला.आज कार्तिकी एकादशी निमित्त येथील साई मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.आज कार्तिकी एकादशी निमित्ताने केळघर ते प्रतिपंढरपुर आंबेघर येथील विठ्ठल धाम मंदिरापर्यंत पायी पालखी दिंडी सोहळा काढण्यात आला. यावेळी मनोहर शिर्के,बबन बेलोशे, राजेंद्र गाडवे,नारायण बेलोशे,तुकाराम धनावडे, आनंदा भिलारे,जयंत गाडवे, अनंता का रंजकर, बाळासाहेब शिर्के,सचिन बिरामणे, अनिल काशिद , विष्णू दळवी, बापू दळवी यांच्यासह भाविक - भक्त उपस्थित होते.