विठ्ठल देशपांडे यांची भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड
केळघर : प्रतिनिधी -
भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते विठ्ठल देशपांडे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड माननीय आमदार शिवेंद्रसिंहराजे राजे भोसले आणि माननीय नामदार चंद्रकांत दादा पाटील यांचे कट्टर समर्थक श्री विठ्ठल देशपांडे यांची भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष धैर्यशील दादा कदम यांनी निवड केल्याचे जाहीर केले .
विठ्ठल देशपांडे हे मेढा येथील रहिवाशी असून शालेय जीवनापासून भारतीय जनता पार्टीचे काम करतात या अगोदर त्यांनी जिल्हा चिटणीस तालुका उपाध्यक्ष तालुका सरचिटणीस पदी काम केले आहे या निवडीमुळे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीने जी जबाबदारी दिली त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टी चे सर्व वरिष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते यांचे मनःपूर्वक आभार मानतो.
या निवडी बद्दल मा.ना.चंद्रकांतदादा पाटील, आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले, भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर आण्णा मोहोळ,प्रदेश उपाध्यक्ष विक्रमजी पावसकर,ना.श्री नरेंद्रजी पाटील साहेब, अतुलबाबा भोसले आदी मान्यवरांनी अभिनंदन केले.