मेढा येथे उद्या ग्राम सुरक्षा यंत्रणा प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

0

 


मेढा येथे उद्या ग्राम सुरक्षा यंत्रणा प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन


मेढा : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) - मेढा पोलीस स्टेशन अंतर्गत ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार दि . ३० रोजी सकाळी १०.०० वा कलश मंगल कार्यालय मेढा येथे आयोजित करण्यात आलेला आहे. मेढा पोलीस ठाणे हद्दीतील सर्व नागरिकांना मेढा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी या प्रशिक्षण कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी जाहीर आवाहन करण्यात आले आहे.

         तरी मेढा पोलीस ठाणे हद्दीतील सर्व प्रतिष्ठित नागरिक, पोलीस पाटील, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, कोतवाल, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, गणेश उत्सव/नवरात्र उत्सव मंडळाचे कार्यकर्ते व नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.


ग्राम सुरक्षा यंत्रणा नेमकी काय आहे ? सर्वसाधारण माहिती


माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात मानवाने परस्परांशी संपर्कासाठी नानाविध साधने बनविली व त्याचा वापर करून मानव प्रगतीही करत आहे. संपर्काची कधी नव्हे एवढी प्रचंड साधने आज जगात उपलब्ध असुन सुध्दा प्रत्यक्ष सं काळात म्हणजे आग, चोरी, दरोडा, लहान मुल हरविणे, महिलांची छेडछाड, वाहन चोरी, शेतातील पिकाची चोरी, गंभीर अपघात, वन्य प्राणी, बिबट्या, तरस, लांडगा यांचा हल्ला आदी घटनांमध्ये तातडीने जवळपास असणाऱ्या नागरिकांशी तत्काळ संपर्क साधुन मदत मागणे आजच्या या उपलब्ध संपर्क साधनांद्वारे शक्य होत नाही. ग्राम सुरक्षा यंत्रणा ग्रामिण भागासाठी सुरू करण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षापासुन शेकडो गावांत यंत्रणा कार्यान्वित आहे. ग्रामस्थ आपापले मोबाईल नंबर आपल्या गावातील ग्राम सुरक्षा यंत्रणेत नोंदवन यंत्रणा वापरत आहेत. संपुर्ण भारतासाठी वापरता येणारा टोल फ्री नंबर 18002703600 वर नोंदणी केलेल्या नागरिकाने संकट काळात फोन केल्यास त्याचा आवाज परिसरातील हजारो नागरिकांना त्वरित मोबाईलवर ऐकु जातो. परिसरातील नागरिकांना घटना घडत असतांनाच तीची मिळाल्याने तातडीने मदत करणे व नुकसान टाळणे शक्य होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)