७० वर्षात मराठ्यांचा मोठा विश्वासघात झाला आहे, आता आरक्षण मिळाल्या शिवाय मराठ्यांनो हटायच नाय एकजूट ठेवा आणि संयम राखा - मनोज जरांगे पाटील

0

 


७० वर्षात  मराठ्यांचा मोठा विश्वासघात झाला आहे, आता आरक्षण मिळाल्या शिवाय मराठ्यांनो हटायच नाय  एकजूट ठेवा आणि संयम राखा - मनोज जरांगे पाटील

मेढा - प्रतिनिधी ( टिम दिव्यदृष्टी नामा ) -
मराठ्यांनो आरक्षण अंतिम टप्प्यात आले आहे ७० टक्के लढा आपण जिंकला आहे फक्त ३० टक्के लढा अजून बाकी आहे २४ डिसेंबरला आपल्याला आरक्षण मिळणारच मात्र काही लोकांना राजकीय फायद्यासाठी जातीय दंगली घडवायच्या आहेत म्हणून तुम्ही संयम राखा आणि मराठा समाजाची अशीच एकजूट ठेवा माझा जीव गेला तरी बेहत्तर मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय इंचभर ही मागे हटणार नाही असा निर्धार मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त करून एक डिसेंबर पासून गावागावात साखळी उपोषण सुरू करावे असे आवाहन मनोज जरांगे -पाटील यांनी केले .
          मेढा (ता. जावली ) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या ऐतिहासिक आशीर्वाद सभेत जरांगे पाटील बोलत होते . यावेळी मनोज जरांगे - पाटील यांना सकल मराठा समाजाच्यावतीने ऐतिहासिक तलवार व पगडी देऊन सत्कार करण्यात आला .
     यावेळी ते पुढे म्हणाले ७० वर्षात मराठा समाजाचा विश्वासघात केला गेला मराठा समाजाला आरक्षण हे होतच पण मराठा समाज गाफील राहिला अनेक नेमलेल्या समित्यांनी मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही असे सांगितले गायकवाड आयोगाने मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध केलं तरीही मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं नाही मंडल आयोगाने एकही जात मागास असल्याचे सिद्ध केलं नाही आणि तो अहवाल पंतप्रधान व्ही पी सिंग यांच्यासमोर आणि त्याला मंजुरीही मिळाली ओबीसींना १९९४ ला आरक्षण दिलं गेलं आणि पुन्हा १९९८ ला आरक्षण वाढवलं फक्त चार वर्षात त्यांची एवढी लोकसंख्या वाढली का ? असा प्रश्न उपस्थित करून जरांगे पाटील म्हणाले व्यवसायाच्या आधारावर आरक्षण देण्यात आली फक्त मराठ्यांनाच आरक्षण देताना वेगळ्या न्याय का लावला गेला आता टोकाच आंदोलन झालं त्यावेळी कुणबीच्या नोंदी सापडायला लागल्यात , सातारा जिल्ह्यात पन्नास हजाराच्यावर कुणबी नोंदी सापडल्या आहेत . राज्यातील असा कोणताही जिल्हा नाही की तिथं मराठा समाज आरक्षणात नाही आतापर्यंत या नोंदी सापडू नयेत म्हणून कोणी प्रयत्न केले .
        मराठा समाजाच्या बाबतीत षडयंत्र केलं गेलं सरकारवर दबाव टाकून या नोंदी दडवून ठेवल्या सत्तर वर्षे आमची कुटुंबे उध्वस्त केली आरक्षणात मराठा समाजाचा घात केला गेला आता मराठा समाज जागृत झालाय सर्वसामान्य मराठ्यांनी आता हा आरक्षणाचा लढा हातात घेतलाय ओबीसी नेत्यांचं नाव न घेता टीका करताना जरांगे पाटील म्हणाले ते विरोधात बोलले म्हणून मी सुरुवात केली कालच्या सभेत मला काय टोकरायची गरज होती का मी पण मराठीची अवलाद आहे त्यांचे वाभाडे काढलेच असते पण मराठा समाजाने मला संयम राखायला सांगितला आरक्षण जवळ आल आहे जरा सबुरीने घ्या असं सांगितलं म्हणून मी शांत आहे असं असंही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं
     जरांगे पाटील म्हणाले,जीवन जगताना पाणी जेवढं आवश्यक आहे तेवढेच आता जीवन जगताना आरक्षण महत्त्वाच आहे
आंदोलनात त्यांनी माझ्यावर खूप डाव टाकण्याचा प्रयत्न केला पण मी तो यशस्वी होऊ दिला नाही मी माझ्या जातीशी प्रामाणिक आहे आरक्षण मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही .
          मराठा समाजाने सत्तर वर्षात सगळे पक्ष मोठे केले कारण गरज पडली तर ते आमच्या उपयोगी पडतील अशी मराठा समाजाला आशा होती पण आज मराठा समाज आक्रोश करतोय पण एकही पक्ष एकही नेता मराठा समाजाच्या मदतीला येत नाही . माझ्या टप्प्यात आल्यावर मी वाजवतोच . मी साधा सरळ माणूस असून माझा मोठ - मोठ्या मातब्बरांनाही अंदाज येत नाही . मी कोणाचेच ऐकत नाही . कारण मी माझ्या समाजाशी प्रामाणिक असून समाजाला मायबाप मानल आहे . मी माझ्या समाजाशी कधीही गद्दारी करणार नाही .

        छगन भुजबळ यांचे नाव न घेता आता कोणीही कितीही वळवळ केली तरी त्याचा फायदा नाही आपलं वय झालंय थोडं शांत बसलेले बरं कायदा पायदळी तुडवू नका . समाजा - समाजात भांडणे लावू नका . मराठ्यांच्या पोरांचं कल्याण व्हायलं लागलं कि कुणाच्या तरी पोटात दुखत अशी टीका केली . तर मराठा समाजाच्या आंदोलनात मीडियाने मराठ्यांची बाजू खूप चांगली सांभाळली त्यांच्यामुळेच मराठ्यांच्या या आंदोलनाला आतापर्यंतचे यश मिळाल्याचे आवर्जून सांगितले .
     जरांगे पाटील म्हणाले, अनेक प्रकारे माझे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. मोठमोठे मंत्री , मातब्बर यायचे, गप्पा मारायचे. मीही ऐकून घ्यायचो. मग त्यांना वाटायचे बरा पटलोय मात्र त्यानंतर आरक्षणाचा मुद्दा काही सोडायचो नाही. त्यामुळे बेणं भलतंच निबार आहे म्हणायचीत . एकदा तर उपोषण स्थळी माझी तपासणी करण्यासाठी त्यांनी डॉक्टरला आणले . त्याने मला किडनीच नसल्याचे सांगितले. उपोषण सोडल्यानंतर मात्र मी तपासले तर मला चांगल्या दोन किडन्या असल्याचे निष्पन्न झाले,

       आपल्या लेकराबाळांसाठी आरक्षण खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही नको त्यांना राजकारणात मोठे केलं. त्यातील एकही साहेब आपल्या आरक्षणाबाबत बोलत नाही. त्यांच्या मुलां - बाळांना मोठ केलं . आता अशा साहेबांचे पोस्टर लावायचे काही दिवस थांबवा आपल्या लेकरांसाठी आरक्षण मिळेपर्यंत मराठ्यांची एकजूट कायम ठेवा, असं कळकळीचे आवाहन संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केले.
      माझं उपोषण सोडवण्यासाठी मातब्बर नेत्यांनी प्रयत्न केले. त्यांना वाटले, याला सहज पटवू, पण मीसुद्धा तयारीचा आहे. त्यांचे तासभर ऐकून घ्यायचे आणि माझ्या विषयावर मी ठाम राहिलो. माझ्यावर अनेकांनी अनेक डाव टाकले ; पण आपल्या मराठा बांधवांच्या पाठिंब्यामुळे कुणाचे काही चालले नाही. आरक्षण मिळणारच आहे. सरकारला द्यावेच लागेल, असेही मनोज जरांगे पाटील यांनी सभेत सांगितले
.



            जरांगे पाटील यांच्या सभेसाठी संपूर्ण मेढा शहराचे वातावरण भगवेमय झाले होते सकाळी अकरा वाजल्यापासून मराठा समाज मोठ्या संख्येने एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं , जय भवानी जय शिवराय अशा घोषणा देत सभास्थळी दाखल होत होता भर उन्हात हजारोंच्या संख्येने मराठा समाज जरांगे -पाटील यांचे विचार ऐकण्यासाठी आतुर झाला होता या सभेला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती . यावेळी शिवसेनेचे ( मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट ) जावली तालुका प्रमुख शांताराम कदम व मेढा शहर प्रमुख संजय सुर्वे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला . प्रारंभी शाहीर रंगराव पाटील यांच्या शाहीरीबाज कार्यक्रमाने उपस्थितांमध्ये चैतन्य निर्माण केले . मराठा - कन्येंनी केलेल्या भाषणांनी उपस्थितांची मने जिंकली तर कार्यक्रमासाठी सकल मराठा समाजाचे समन्वयक , स्वयंसेवक , गावा - गावातील कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलासबाबा जवळ यांनी केले . मराठा योध्दा जरांगे - पाटील यांच्या सभेसाठी केळघर बाजारपेठ स्वयंस्फूतीने बंद ठेवण्यात आली होती . यावेळी पोलीस प्रशासन , नगरपंचायत , वीज वितरण कंपनी , आरोग्य विभाग आदिंनी सहकार्य केले . कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता .


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)