फोटो - करहर -आपले सरकार सेवा केंद्राचे उदघाट्न करताना गणेश जाधव, प्रदीप बेलोशे , किरण भिलारे, पूनम भिलारे आदि .
केळघर : वार्ताहर - शासकीय योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी समाजाच्या तळागाळात जाऊन काम करावे . असे आवाहन भाजपाच्या पंचायतराज ग्रामविकास विभागाचे जिल्हा अध्यक्ष गणेश जाधव यांनी केले .
मौजे करहर ता. जावली येथील किरण भिलारे यांच्या आपले सरकार सेवा (CSC) केंद्राचे उदघाट्न प्रसंगी ते बोलत होते . यावेळी भाजपा पंचायतराज ग्रामविकास विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप बेलोशे, अनिल माने, सौ.पूनमताई भिलारे, विठ्ठल काकडे ( सोशल मीडिया ), तालुका अध्यक्ष सौ. सोनियाताई धनावडे, मेढा शहर अध्यक्ष विनोद वेंदे, जावली तालुका उपाध्यक्ष भानुदास ओंबळे, रोहित नवसरे, जावली सोशल मिडिया संयोजक संजय चिकणे आदि उपस्थित होते .यावेळी किरण भिलारे म्हणाले, सरकारी योजनाचा लाभ जास्तीत जास्त लोकांपुढे पोहचवण्यासाठी या CSC सेंटरच्या माध्यमातून काम करून पंचायतराज व भाजप पक्षवाढीसाठी दिवसरात्र काम करू . यावेळी किरण भिलारे यांची पंचायतराज ग्रामविकास विभाग सोशल मीडिया जावली तालुका सहसंयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली. यावेळी ग्रामस्थ , महिला वर्ग उपस्थित होते. प्रारंभी किरण भिलारे यांनी स्वागत केले .