शिक्षण क्षेत्रातील विविध मागण्यांचे जावली तालुक्याचे तहसीलदार हणमंत कोळेकर यांना देण्यात आले निवेदन.

0

 


फोटो -मेढा - शिक्षण क्षेत्रातील विविध मागण्यांसाठी  मूक मोर्चात सहभागी झालेले शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी .

केळघर : वार्ताहर - सातारा जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ आणि त्या अंतर्गत येणाऱ्या शिक्षण क्षेत्रातील सर्व संघटनांच्यावतीने जावली तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालक संघटनेचे पदाधिकारी, पालक प्रतिनिधी यांचेवतीने  शिक्षण क्षेत्रातील विविध मागण्यांचे निवेदन जावली तालुक्याचे तहसीलदार  हणमंत कोळेकर  यांना देण्यात आले.
     प्रारंभी पंचायत समिती जावली येथून आंदोलनाचा एक भाग म्हणून मूक मोर्चाला सुरुवात झाली मोर्चा पंचायत समितीतून तहसील कार्यालयामध्ये येत असताना सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मागण्यांविषयीचे फलक दाखवून समाजातील विविध घटकांचे व मिडियाचे लक्ष वेधून घेतले.
       तहसीलदार श्री . कोळेकर यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर  सदरचे निवेदन शासनाकडे पाठविण्याची ग्वाही दिली. तसेच शिक्षण क्षेत्रातील असलेल्या समस्या लवकरात लवकर सुटण्यासाठी शुभेच्छा  दिल्या.
         मूक मोर्चा निघण्यापूर्वी मोर्चात सहभागी झालेल्या सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू-भगिनींना श्री वेण्णा विद्यामंदिर मेढाचे प्राचार्य श्री पाटील सर यांनी मार्गदर्शन केले. मागणीचे निवेदन दिल्यानंतर उपस्थितांना श्री खाडे सर यांनी मार्गदर्शन केले.  जयवंत तरडे सर यांनी मोर्चात सहभागी झालेल्या शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींचे आभार व्यक्त केले .आंदोलनाच्या सर्व परवानगी आणि तांत्रिक बाबींचे कामकाज सुनील धनावडे सर यांनी केले.
   यावेळी तालुक्यातील बहुतांश शाळेतील मुख्याध्यापक ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ,संस्था पदाधिकारी ,विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)