मतदार यादीच्या अचूकतेसाठी नागरिकांनी व राजकीय पक्षांनी प्रशासनास सहकार्य करावे . 262 सातारा - जावली विधानसभा मतदारसंघाचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार जावली हणमंत कोळेकर यांचे आवाहन.

0

 


मेढा : ( टिम दिव्यदृष्टी नामा प्रतिनिधी ) -

जावली भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि. १ जानेवारी २०१६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दि. २७ ऑक्टोबर ते १ डिसेंबर २०१३ या कालावधीमध्ये नागरिकांकडून दावे व हरकती म्हणजेच नागरिकांकडून मतदार नोंदणीचे मतदार यादीतील दुरुस्ती व वगळणीचे अर्ज मागविण्यात येणार आहेत. मतदार यादी अचूक होण्यासाठी नागरिकांनी व राजकीय पक्षांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जावली विधानसभा मतदारसंघाचे सहा मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार जावली हणमंत कोळेकर यांनी केले आहे.

      या कार्यक्रमांतर्गत अधिकाधिक नागरिकांची मतदार नोंदणी करून घेण्यासाठी विशेष मतदार नोंदणी शिबिरे आयोजित करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. त्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत तहसिलदार जावली तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी हणमंत कोळेकर यांनी माहिती दिली.

      मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२४ अंतर्गत दि. ४ नोव्हेंबर २०२३ (शनिवार), दि. ५ नोव्हेंबर २०२३ (रविवार) तसेच दि. २५ नोव्हेंबर २०२३ (शनिवार) व दि. २६ नोव्हेंबर २०२३, (रविवार) या चार दिवशी सकाळी १० वाजल्यापासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदार संघातील सर्व मतदान केंद्रावर विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. या शिबिरामध्ये नागरिकांचे मतदार नोंदणी, नाव दुरुस्ती व वगळणी अर्ज भरून घेण्यात येणार आहेत.

     मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर मतदार नोंदणी अधिकारी तसेच मतदान केंद्राच्या सूचना फलकावर दावे व हरकतीची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या यादीमधील मयत मतदार वगळून इतर मतदारांची नावे वगळण्यासाठी प्रस्तावित करण्यात आले आहेत. अशा मतदारांना वैयक्तिक लेखी सूचना दिल्यानंतर तसेच राजकीय पक्षांना दावे व हरकतीची यादी उपलब्ध करुन दिल्यानंतर किमान सात दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यावर दावे व हरकतींवर निर्णय घेण्यात येणार आहे.

मतदार यादीमध्ये मतदार नोंदणीसाठी नमुना क्र ६ भरावे. त्यासोबत रहिवास पुरावा म्हणून वीज देयक, पाणीपट्टी, आधार कार्ड, बैंक किंवा पोस्टाचे पासबुक, भारतीय पारपत्र, नोंदणीकृत विक्रमखत, नोंदणीकृत भाडेकराराची तसेच वयाचा पुरावा जन्म प्रमाणपत्र, आधारकार्ड, राज्यशिक्षण मंडळाने निर्गमित केलेले दहावी किंवा बारावी उत्तीर्ण झाल्याबाबतचे प्रमाणपत्र जोडावे.

मतदार यादीमधून नाव वगळण्यासाठी नमुना क्र. ७ भरावे. त्यासोबत व्यक्तीचा मृत्यू दाखला, जोडावा.

       मतदान यादीतील किंवा मतदान ओळखपत्रातील दुरुस्ती करण्यासाठी नमुना क्र. ८ भरावे. पत्याचा पुरावा म्हणून वीज देयक, पाणीपट्टी, आधार कार्ड बँक किंवा पोस्टाचे पास बुक, भारतीय पारपत्र, नोंदणीकृत विक्रीखत, नोंदणीकृत भाडेकरार तसेच वयाचा पुरावा म्हणून जन्म प्रमाणपत्र, आधारकार्ड, राज्य शिक्षण मंडळाने निर्गमित केलेले दहावी किंवा बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र, पारपत्र आदी कागदपत्रे जोडावीत, अशी माहिती यावेळी दिली.

        अंतिम मतदार यादी दि. ५ जानेवारी २०२४ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. दावे व हरकती सादर करण्यासाठी अर्ज मार्फत सादर करण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज दाखल करण्याकामी https://ceoelection.maharashtra.gov.in/searchlist/voters. •eci.gov.in या मोबाईल ऍपवर अर्ज सादर करता येईल. या मोहिमेसंदर्भात नागरिकांना किंवा मतदारांना कोणतीही अडचण आल्यास त्यांनी मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय किंवा तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेत थेट संपर्क साधावा, असे आवाहन श्री कोळेकर यांनी केले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)