दिवदेववाडी - लक्ष्मण जुनघरे यांचा सत्कार करताना उदय शिंदे, मिलन मुळे , किरण यादव व अन्य मान्यवर....
शैक्षणिक साहित्याचे वाटप करून सेवापुर्ती.... लक्ष्मण जुनघरे यांचा विधायक उपक्रम...
केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -
शिक्षण क्षेत्रातील बत्तीस वर्षाच्या सेवेचा समारोप करताना शैक्षणिक साहित्य वाटपाचा विधायक उपक्रम राबवून लक्ष्मण जुनघरे यांचा सेवापूर्ती कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभुळवाडीचे मुख्याध्यापक लक्ष्मण सिताराम जुनघरे हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांनी कुसुंबीच्या ग्रामस्थांच्या मदतीने त्यांनी न्यु. इंग्लिश स्कूल कुसुंबी या हायस्कूलची स्थापना केली व त्या हायस्कूलच्या मुख्याध्यापक पदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. दरम्यान जिल्हा परिषद सातारा यांचे वतीने शिक्षक भरती करण्यात आली. या भरतीप्रक्रियेतुन लक्ष्मण जुनघरे यांची जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक पदावर निवड झाली. दिवदेव येथे शाळेवर हजर झाल्यानंतर त्यांनी दिवदेव, मार्ली, भालेघर, सायघर, तळेमाळ, हातगेघरमुरा या गावातील ग्रामस्थ एकत्रित करून सह्याद्री विद्यालय दिवदेव, मार्ली विद्यालयाची स्थापना केली. स्वतः शिक्षकांचे पगार देऊन विद्यालय चालवले.
नवनिर्मिती व कृतिशिलता असलेल्या जुनघरे यांनी जुन्या सायकलला बॅटरी बसवून इलेक्ट्रीक सायकल तयार केली आहे. त्यांच्या या पर्यावरण पुरक संशोधनाची मिडीया सह अनेकांनी दखल घेतली.
सेवानिवृत्ती निमित्त आयोजित कार्यक्रमात शिक्षक नेते मिलन मुळे, समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे, शिक्षक भारतीचे नेते सुर्यकांत पवार, शिक्षक बँकेचे चेअरमन किरण यादव, केंद्रप्रमुख
अरविंद दळवी, नारायण शिंगटे, नितीन मोहिते, बचाटे गुरुजी, धनाजी कलिकते, शिंगटे सर, शंकरराव देशमुख आदींसह शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक, परिसरातील गावांचे सरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अजित राक्षे यांनी केले व आभार तुकाराम शेलार यांनी मानले.