जावली तालुक्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढली , ४९ गावांतील जनतेच्या घशाला कोरड

0

 

जावली तालुक्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढली , ४९ गावांतील जनतेच्या घशाला कोरड


मेढा : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -


       जावली तालुक्यातील ४९ गावे टंचाईग्रस्त झाले असून या गावांच्या सर्वसामान्य जनतेच्या घशाला कोरड पडली असून यातील फक्त ५ गांवाना टँकरने पाणीपुरवठा करणेत आला असून बऱ्याच गावांची टँकरची मागणी वाढू लागली आहे.

     अतिवृष्टीची जावली म्हणून संपुर्ण जिल्हयाला तालुक्याची ओळख आहे.परंतू जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच पाणी टंचाईला हळूहळू बऱ्याच गावच्या लोकांची पाण्यासाठी धावाधाव सुरू झाल्याचे चित्र काही गावांमध्ये पाहायला मिळते. यावर्षी पाऊस कमीप्रमाणात पडल्याने यंदा पाण्याचे दुर्भिक्ष मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. निम्याच्या जास्त प्रमाणात गावे टंचाईग्रस्त असल्याने इतर गांवाना टँकरची मागणी करून सुद्धा अजूनही बरीच गावे टँकरच्या प्रतिक्षेत आहेत. वाटांबे,सावरी, दंड वस्ती(बामणोली) काळोशी,खिलारमुरा, केळघर, ओखवडीमुरा, भोगवली तर्फ मेढा, आलेवाडी, निपाणी मुरा या गांवानी टँकरसाठी मागणी केली आहे. जावली तालुक्यातील ही ४९ गावे मोठ्या प्रमाणात तहानलेली असून अजूनही अशंतः बरीच गावे पाण्यासाठी दाही दिशा भटंकती करताना दिसत आहेत.
       जावली तालुक्यात उन्हाचा पारा ४० अंशावर पोहचला असल्याने विहीरीचे, कुपनलिकेचे पाण्यात कमालीची घट झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. यामुळे बऱ्याच गावांना पाणी टंचाईने अक्षरश: डोळ्यातून पाणी निघत आहे. विहीरी व कुपनलिका कोरड्या पडल्याने बऱ्याच गावात पाणी विकत तेही ३०० रुपये १००० लिटर पाणी घेण्याशिवाय पर्याय उरला नाही. कण्हेर जलाशय मेढा विभागात पूर्णपणे कोरडे पडले आहे यामुळे जनावरांना पाणी पाजणे सुद्धा कठीण होतआहे.
प्रशासन किती गावांना व कुठे कुठे टँकर पुरवणार अशी अवस्था प्रशासनाची निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणुकीचा कालावधी असल्याने पुर्ण प्रशासन त्या यंत्रणेत गुंग झाले आहे. परंतू ज्या गावांनी टँकरची मागणी केली आहे अशा तरी गावांना तात्काळ टँकर पुरवण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.
      तालुक्यात पाणीटंचाईचे सावट मोठया प्रमाणात निर्माण झाले असताना पंचायत समिती, तहसिल कार्यालयातील आधिकारी मात्र निवडणुकीच्या मीटिंग मध्ये व्यस्त आहेत. 

** जिथे पाणीटंचाई जास्त जाणवते तिथे प्रस्तावाची वाट न बघता शासकीय टँकर चालू करा पण लोकांना तहानलेले ठेवू नका अशा सुचना सातारा -जावलीचे आ. श्री.छ. शिवेंद्रराजे भोसले यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या.

** जावली तालुक्यात पाणी टंचाईचे मोठे सावट निर्माण झाले असून शेतकरी बांधवांनी पिण्याच्या पाण्याचा वापर काटकसरीने व्यवस्थित करायचा आहे . शेतीला पाणी न देता पिण्यासाठी पाणी साठवून ठेवावे असे आवाहन पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाचे अभियंता आर बी साठे यांनी केले आहे.


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)