केळघर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शंकर बेलोशे यांची बिनविरोध निवड

0

 


केळघर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शंकर बेलोशे
यांची बिनविरोध निवड


केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -   केळघर.ता.जावली येथील उपसरपंच पदाचा  एक वर्षांचा कार्यकाल समाप्त झाल्याने सागर पार्टे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे उपसरपंचपद रिक्त होते . यावेळी निवडणुक निरिक्षक अधिकारी तथा मंडल कृषि अधिकारी संजय घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या विशेष सभेत उपसरपंचपदी शंकर गणपत बेलोशे यांचा एकच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
   यावेळी सरपंच सविता बेलोशे,ग्रामपंचायत सदस्य काशिनाथ बेलोशे, हिराबाई भिलारे,सागर पार्टे,आशा चव्हाण,दिपाली बेलोशे, यांच्या उपस्थितीत बिनविरोध  निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक निरीक्षक अधिकारी म्हणून मंडल कृषी अधिकारी  संजय घोरपडे व ग्रामसेवक शिवाजी निर्मल यांनी काम पाहिले.
     सर्वांना बरोबर घेऊन गावच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार असल्याचे यावेळी नूतन उपसरपंच शंकर बेलोशे यांनी सांगितले . निवडीनंतर फटाक्यांची आतषबाजी करून गुलालाची उधळण करण्यात आली.उपसरपंच शंकर  बेलोशे यांना ग्रामस्थ राजकिय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस  शुभेच्छा दिल्या.
यावेळी मा. सरपंच बबनराव बेलोशे, मा. उपसरपंच सुनील नाना जांभळे, मा.उपसरपंच सचिन बिरामणे, युवराज धुमाळ, बाजीराव पार्टे, शंकर बिरामणे , बाळासाहेब कडव, सुनिल बेलोशे, सुनिल बिरामणे, सतिश बेलोशे, शैलेश पार्टे दिपक शिंदे , ग्रामस्थ उपस्थित होते.


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)