मेढा आगारात रक्तदान व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन , मेढा आगार स्वच्छ व सुंदर बसस्थानक क गटात अभियानात व्दितीय क्रमांक

0

 



मेढा:आगाराच्या वतीने आयोजित नेत्रतापासनी व रक्तदान शिबिराच्या प्रारंभप्रसंगी नीता बाबर-पवार, समवेत अधिकारी व कर्मचारी


मेढा आगारात  रक्तदान व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन , मेढा आगार स्वच्छ व सुंदर बसस्थानक क गटात अभियानात व्दितीय क्रमांक

 -आगार व्यवस्थापक नीता बाबर-पवार यांची माहिती


मेढा : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज) - एसटी महामंडळाच्या मेढा आगारात मेढा आगार व अक्षय ब्लड बँक सातारा यांच्या वतीने बसस्थानक परिसरात  नुकतेच रक्तदान व नेत्रतपासनी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराचे उदघाटन आगार व्यवस्थापक नीता बाबर -पवार यांच्या हस्ते करण्यात आले.मेढा आगार कामगारांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी वेळोवेळी असे उपक्रम घेत असते.त्यामुळे हिंदुह्र्दयसाम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ् व सुंदर बसस्थानक अभियानात सलग दुसऱ्यांदा क गटात प्रथम क्रमांक मेढा आगराने मिळवल्याचे आगार व्यवस्थापक बाबर यांनी  यावेळी सांगितले.या रक्तदान शिबिरास कर्मचारी व प्रवासी बांधवांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी अक्षय ब्लड बँकेकडून रक्तदात्यांना आकर्षक भेटवस्तू  देण्यात आली. याप्रसंगी  कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांचीहि तपासणी करण्यात आली.यावेळी आगार व्यवस्थापक नीता बाबर-पवार, सहायक कार्यशाळा अधीक्षक सुजित घोरपडे,आगार लेखाकर सचिन जाधव यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.



Post a Comment

0Comments
Post a Comment (0)