स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसच्या प्रियांक खर्गे यांचा भाजपाच्यावतीने मेढ्यात निषेध
मेढा : प्रतिनिधी- ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) - स्वातंत्रवीर सावरकर यांच्या बद्दल अपमान कारक वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसच्या प्रियांक खर्गे यांच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री धैर्यशील दादा कदम यांच्या सूचनेनुसार आणि मा. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री विठ्ठल देशपांडे,तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे आणि महिला मोर्चा अध्यक्ष सौ वैशाली सावंत, कामगार आघाडीचे प्रदेश प्रदेश उपाध्यक्ष श्री भाईजी गावडे, ओबीसी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सौ गीताताई लोखंडे, युवा नेते संतोष वारागडे, सदाशिव जवळ, किरण ढेबे, प्रविण गाडवे, बाळासाहेब पंडित, धनंजय खटावकर, संतोष करंजेकर, आनंद गाडगीळ,अथर्व गाडगीळ,सौ.मुकणेताई ,नगरसेवक विकास देशपांडे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक मेढा या ठिकाणी या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन आदरणीय स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसच्या प्रियांक खर्गे यांच्या बद्दल निषेध व्यक्त करून,स्वा.सावरकर की अपमान नही सहेगा हिंदुस्थान ' अशा निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या आणि जावळीचे तहसीलदार हणमंत कोळेकर , आणि मेढा पोलीस स्टेशनचे एपीआय संतोषजी तासगावकर यांना याबद्दल निवेदन देण्यात आले.