कुटुंब व्यवस्था जपण्यासाठी युवकांनी दक्ष रहावे - व्याख्याते प्रा.वसंत हंकारे

0

 


 पितृछत्र हरपलेल्या २ मुलीं सोबत राजेंद्र धनावडे त्यांचे कुटूंबिय व मित्रपरिवार.समवेत वसंत हंकारे ,मनोज लेंडवे आदी


कुटुंब व्यवस्था जपण्यासाठी युवकांनी दक्ष रहावे - व्याख्याते प्रा.वसंत हंकारे

केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा ) सोशल मीडिया ,प्रगत तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले आहे. आपण चंद्रावर जाऊन पोहचलो मात्र महाराष्ट्रात वृद्धाश्रमांची संख्या वाढते आहे, हे चित्र भूषणावह नाही. पैसे कामावण्यापेक्षा आपल्या बापाला जपा. कोणत्याही संकटात आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा हा आपला बाप असतो त्यामुळे आपल्या बापाची मान समाजात उंचावण्यासाठी युवकांनी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्याख्याते प्रा. वसंत हंकारे यांनी येथे कै. लक्ष्मण कोंडीबा धनावडे यांच्या १३ व्या स्मृतिदिनामित्त आयोजित बाप समजून घेताना या व्याख्यानात  व्यक्त केली.


   यावेळी हंकारे पुढे म्हणाले, युवकांनी नशेच्या आहारी न जाता परिश्रम, प्रामाणिकपणा जपून स्वकर्तुत्वाने मोठे व्हावे,यात च आपल्या बापाचा मोठेपणा आहे.ज्या घरात बाप आहे, ते घर जगातील श्रीमंत घर असते. आईचे अश्रू दिसतात पण बापाचे अश्रू कधीच दिसत नाहीत. ज्याला बाप नाही त्यालाच बापाची खरी किंमत समजते. योग्य कर्तृत्व, संघर्ष करून यश मिळवून आपल्या आई बापाची मान अभिमानाने उंचावण्यासाठी युवकांनी दक्ष राहावे. मुलींनी आपल्या बापाला कधीच कमीपणा आणू देऊ नये. कुटुंबासाठी दिवसरात्र राबणाऱ्या बापाची कदर केली तर आयुष्यात काहीच कमी पडणार नाही त्यामुळे आपल्या बापाला जपा असे आवाहन त्यांनी शेवटी केले.

येथील लक्ष्मण कोंडीबा धनावडे यांच्या १३व्या स्मृतिदिनामित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.   आपल्या वडिलांच्या स्मृतिदिनामित्त उद्योजक  राजेंद्र धनावडे  यांनी   २ मुलींना दत्तक घेऊन त्यांची शैक्षणिक व कन्यादानापर्यंतची सर्व जबाबदारी आपल्या मित्रांच्या  सहकार्याने घेतली  . या वेळी एकनाथ ओंबळे, अमित  कदम , डॉ. शाहीर आझाद नायकवडी, शिवनाथ कापडी, बाजीराव कमानकर,मनोज लेंडवे, मनोज ठाकरे, धोंडीराम रायते,प्रकाश चतुर, रुपेश जंजिरे,  बाजीराव धनावडे,वैभव ओंबळे, अशोक पार्टे, जगन्नाथ पार्टे ,दीपक मोरे, बोंडारवाडी धरण कृती समितीचे सर्व कार्यकर्ते  , परिसरातील.   ग्रामस्थ , महिला , कॉलेज व शाळांमधील विद्यार्थी -विद्यार्थिनी व शिक्षक वर्ग , उपस्थित होते.                                        

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)