वाईच्या अनुष्का गोंजारीने पटकावली राज्यस्तरीय शालेय जिमनॅस्टिकमध्ये तीन कास्य पदके
केळघर : प्रतिनिधी - शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय जिमनॅस्टिकमधे मिलिंद मल्टिपर्पज हायस्कूलची विद्यार्थिनी व वाई येथील रहिवासी अनुष्का तानाजी गोंजारी हिने वैयक्तिक गटात ३ कास्य पदके तर,सांघिक गटात एक रौप्य पदक मिळवून उज्वल यश संपादन केले आहे.
महाबळेश्वर आगारातील वाहक तानाजी गोंजारी यांची अनुष्का ही कन्या आहे. बालेवाडी येथे झालेला राज्यस्तरीय शालेय जिमनॅस्टिक स्पर्धेत वैयक्तिक गटात फ्लोर,valut, व all around या प्रकारात अनुष्काने प्रत्येकी. एक अशी एकूण ३ कास्य पदके मिळवली आहेत.तसेच सांघिक गटात अनुष्काच्या संघाने रौप्य पदक मिळवले आहे. अनुष्काला संजय मोरे व पिंकी डेब यांनी मार्गदर्शन केले. अनुष्काच्या या घवघवीत यशाबद्दल तिचे मान्यवरांनी अभिनंदन व कौतुक केले