सातारा - जावलीतील ५३ कामांसाठी १० कोटी मंजूर

0

 



सातारा - जावलीतील ५३ कामांसाठी १० कोटी मंजूर

केळघर : प्रतिनिधी ( टिम दिव्यदृष्टी नामा ) - सातारा - जावली मतदारसंघातील आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातून मतदारसंघातील ५३ विकासकामे मार्गी लावण्यासाठी तब्बल १० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. आ. शिवेंद्रराजेंच्या पाठपुराव्यातून राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविणे लेखाशिर्ष २५१५ योजननेंतर्गत हा निधी उपलब्ध झाला आहे. निधी मंजूर केल्याबद्दल आ. शिवेंद्रराजेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
  सातारा तालुक्यातील केळवली ते ते दत्तवाडी रस्ता करणे ५० लाख, सोनवडी येथे सभामंडप बांधणे २५ लाख, लिंब आवळीमाथा ते दुलाचे टेक रस्ता खडीकरण डांबरीकरण २० लाख, शिंदेघर अंतर्गत रस्ता खडीकरण, डांबरीकरण १५ लाख, लूमनेखोल जानाई मंदिराकडे जाणारा रस्ता खडीकरण, डांबरीकरण २० लाख, सावली अंतर्गत रस्ता खडीकरण, डांबरीकरण १० लाख, पाटेघर अंतर्गत रस्ता डांबरीकरण १५ लाख, वेणेखोल अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण १० लाख, तांबी येथील वाघजाई मंदिर परिसरात कॉक्रीटीकरण , पेव्हर बसविणे १० लाख, नित्रळ अंतर्गत खडीकरण, डांबरीकरण २० लाख, खडगाव अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण १५ लाख, कूस खुर्द भैरवनाथ मंदिराशेजारी संरक्षक भिंत बांधणे १० लाख, यादववाडी अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण १० लाख, बोरणे अंतर्गत रस्ता खडीकरण, डांबरीकरण १० लाख, आलवडी अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण १० लाख, करंजे तर्फ परळी अंतर्गत रस्ता खडीकरण, डांबरीकरण २५ लाख, वावदरे गावठाण अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण १५ लाख, दरे तर्फ परळी अंतर्गत रस्ते डांबरीकरण १५ लाख, कोंडवली श्री दत्त मंदिरासमोर सभामंडप बांधणे १० लाख, ठोंबरेवाडी हनुमाननगर रस्ता करणे १० लाख, नागेवाडी काळकाई देवी रस्ता खडीकरण, डांबरीकरण उर्वरित काम करणे १० लाख, हनुमाननगर ते इंगळेवाडी पोहोच रस्ता ५० लाख, बेबलेवाडी ठोंबरेवाडी पोहोच रस्ता ४० लाख, शेंद्रे ए.बी.आय. टी. कॉलेज ते कातकरी वस्तीकडे जाणारा रस्ता ५० लाख, आगुंडेवाडी पोहोच रस्ता करणे ३५ लाख, जोतिबाची वाडी येथे जोतिबा मंदिरासमोर कॉक्रीटीकरण ५ लाख, जोतिबाची वाडी सभामंडप १५ लाख, कामथी अंतर्गत रस्ता २० लाख आदी कामांचा समावेश आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)