सर्वांगीण विकास साधायआपलाचा असेल तर ग्रंथ वाचनाशिवाय तरणोपाय नाही . - प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी .

0

 


फोटो - मेढा - ग्रंथ प्रदर्शनप्रसंगी मार्गदर्शन करताना प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही गिरी शेजारी प्रमोद घाटगे , सुधीर नगरकर व विद्यार्थी .

केळघर : वार्ताहर - आजच्या युगात ज्ञानाला खूप महत्व आहे,हे ज्ञान गुरुबरोबरच ग्रंथसंपदेत भरून उरले आहे.आपल्याला आपला सर्वांगीण विकास साधायचा असेल तर ग्रंथ वाचनाशिवाय तरणोपाय नाही. असे प्रतिपादन आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही गिरी यांनी व्यक्त केले.

मेढा (ता. जावली ) येथील आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयातील ग्रंथालयाच्यावतीने माजी राष्ट्रपती व थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन " वाचन प्रेरणा दिन " म्हणून साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून  बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे उपप्रचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, आज ज्या महान व्यक्तीची जयंती आज आपण साजरी करत आहोत,त्यांना लहानपनापासूनच वाचनाची प्रचंड आवड होती.डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचा जीवनामध्ये शिक्षणाच्या परिस्पर्श झाल्यामुळे  तसेच जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, अभ्यासातील सातत्य व सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांनी अभ्यासाच्या व्यासंगातून शास्त्रज्ञ झाले आणि राष्ट्रपती पदापर्यंत  पोहचले तसेच मेहनत व प्रामाणिकपणा अंगीकारून यशस्वी झेप घेतली.म्हणूनच ज्ञानाधिष्ठित समाजनिर्मिती करायची असेल तर, ग्रंथवाचन करून ज्ञान,मनन,चिंतन करून ज्ञान संकलन करावे व अशा महापुरुषांचे अनुकरण विध्यार्थ्यानी करावे आणि आपले भविष्य उज्वल घडवावे " असे आवाहन त्यांनी यावेळी  केले.

        उपप्राचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांनी विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाचा जास्तीत जास्त वापर करून आपली वाचन सवयी जोपासावी  हा संदेश दिला.

       प्रारंभी ग्रंथपाल डॉ. सुधीर नगरकर यांनी प्रास्ताविक केले.याप्रसंगी  ग्रंथालयातील नियतकालिकांचे ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले. तसेच ग्रंथालयाकडून करंट कंटेंट सर्व्हिस सुरू करण्यात आली. याचा लाभ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी घेतला.

कार्यक्रमासाठी विध्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रा.राजेंद्र ननावरे यांनी आभार मानले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)